जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज)उटी बुद्रुक येथे सतत अपमान सहन न झाल्याने संतापलेल्या पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना ७ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लक्ष्मी पवन धुंदाळे (वय २४) असे खून झालेल्या महिलचे नाव असून, तिचा पती पवन गजानन धुंदाळे (वय २८) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन आणि लक्ष्मी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पत्नी लक्ष्मी ही पतीला “तुम्ही काही कामाचे नाही, जाऊन मरा” अशा शब्दांत वारंवार अपमान करत असल्याने पवन संतापलेला होता. या संतापाच्या भरात त्याने ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता झोपलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून तिची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार नितीन पाटील, पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे आणि पोहेकॉ गजानन मानकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपी पवनला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी बीएनएस कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयाने ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय स्नेहा शेंडगे करत आहेत.













