संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज)– तालुक्यातील पातुर्डा परिसरातील एका गावात राहणारी दोन मुलांची आई गेले १६ दिवसांपासून बेपत्ता आहे.
संतोष पाचपोर या विवाहितेचा पती कामावर गेला असताना आणि वृद्ध आजी-आजोबांपैकी आजोबा घराबाहेर गेलेले असताना, तिने आपल्या दोन लहान मुलांना दुकानावरून खाऊ आणून दिला आणि घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. तिच्या बेपत्त्यानंतर नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र ती अद्याप सापडलेली नाही.या प्रकरणी संतोष पाचपोर यांनी तामगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.