आंचरवाडी (बुलडाणा कव्हरेज न्युज):
आज वसुबारस या पवित्र सणानिमित्त आंचरवाडी येथे गोमातेचे पूजन भक्तिभावाने करण्यात आले. या पूजनाचा मान भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. संतोष काळे व त्यांच्या पत्नी मनीषाताई संतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी संतोष काळे यांनी गोमातेचे पूजन करून हिंदू संस्कृती, परंपरा आणि मातृत्वाच्या प्रतीक असलेल्या गोमातेबद्दल असलेले आपुलकीचे आणि श्रद्धेचे दर्शन घडवले.
कार्यक्रमास आंचरवाडी येथील गावकरी, महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने सर्वत्र धार्मिक आणि संस्कृतीमय वातावरण निर्माण झाले होते.
वसुबारसेनिमित्त आंचरवाडीत गोमातेचे पूजन; हिंदू संस्कृतीवरील प्रेमाचे दर्शन – भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे सपत्नीक उपस्थित!
Published On: October 19, 2025 6:29 pm















