कधी तिच्या घरी तर कधी वाशिमच्या हॉटेलवर जाऊन तिच्यासोबत वारंवार…

गावातील तलावावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या पिडीत मुलीला एकटीला पाहून तिच्यासोबत...

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – डोणगाव येथील प्रताप अशोक मानवतकर नावाच्या व्यक्तीने ३३ वर्षीय महिलेला धमकावून जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.मागील पंधरा महिन्यांपासून आरोपीने महिलेला कधी तिच्या घरी तर कधी वाशीममधील हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला.

यावेळी त्याने महिलेचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडीओ मोबाइलमध्ये काढले. नंतर “हे तुझ्या नवऱ्याला दाखवेन, मुलांना मारून टाकेन” अशा धमक्या देत सतत शारीरिक व मानसिक छळ केला.याचबरोबर, आरोपीने हा व्हिडीओ आपल्या चुलत बहिणीला (रा. डोणगाव) आणि मेहुण्याला (रा. गोवर्धन, ता. रिसोड, जि. वाशीम) पाठवला. तसेच महिलेच्या नातेवाईकांना दाखवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रताप अशोक मानवतकर व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!