Advertisement Advertisement

पोलिसांनी सगळीकडं शोध घेतला, नमुने तपासले अन् अखेर दोघे सापडले; मलकापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील एका गावातील शेतमजूर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातील दोन तरुणांना अटक केली आहे. राकेश महेंद्रसिंग भिलाला (२२) आणि जामसिंग रोशन भिलाला (२२), दोघेही रा. जामठी, ता. जि. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजता घडली होती. याप्रकरणी १८ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासाला गती देण्यात आली. घटनास्थळी डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट विश्लेषण पथकाला पाचारण करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी दोनशेहून अधिक संशयितांचे नमुने गोळा करून त्यांची पडताळणी केल्याची माहिती आहे.

तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी पहाटे १.२८ वाजता राकेश भिलाला आणि जामसिंग भिलाला यांना अटक करण्यात आली.

अटकेनंतर दोन्ही आरोपींना २६ ऑगस्ट रोजी मलकापूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलिस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!