अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : अमडापूर पोलिसांनी बोरगाव काकडे येथे छापा टाकून एका युवकाकडून तलवार जप्त केली आहे. विशाल उर्फ विकी भाकर खानझोडे (वय 28) असे या युवकाचे नाव आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी घराची तपासणी केली असता, पलंगाखाली 31.5 इंच लांबीची जुनी तलवार आढळली. या तलवारीची किंमत साधारण 200 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तलवार बाळगण्यासाठी युवकाकडे कोणताही परवाना नसल्याने त्याच्यावर शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.











