बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) गौण खनिज प्रकरणात सापडले वाहन सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोन तलाठ्यांना शंका येताच लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र पडताळणी यशस्वी झाल्याने लाचलुचपत विभागाने दोन्ही तलाठ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई ३० सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आली. या कारवाई मुळे महसूल विभागात खळबळ उडाली. घेतले
तक्रारदार यांच्या नातेवाइकांचे काही वाहन उत्खनन प्रक्रियेत सातत्याने असतात. १० सप्टेंबर रोजी शेगाव तालुक्यातील माटरगाव परिसरात तीन वाहन गौणखनिजांची वाहतूक करत असल्याचे तलाठी अरुण गुलाब डाबेराव (वय ५७) यांना आढळले. त्यांनी तत्काळ वाहन अडवून तपासणी केली. यावेळी डाबेराव यांनी वाहनचालकांना सदर वाहन शेगाव तहसील कार्यालयात लावण्याचे आदेश दिले. तसेच हे वाहन सोडायचे असल्यास ५० हजार रुपयांची मागणी केली. यावेळी वाहन चालकांनी आपल्याजवळची १९ हजार रुपये तलाठी डाबेराव यांना दिले. उर्वरित ३१ हजारांची रक्कम नंतर देण्याचे ठरले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस उप अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण वेरुळकर, दिगांबर जाधव, नीलेश शेगोकार, असलम शहा, गोपाल किरडे, शालु हंबर्डे, सलीम खान यांनी पार पाडली.
दरम्यान, वाहन मालकांनी या संदर्भात ११ सप्टेंबर रोजी लाचलुचपत विभाग, अकोला यांच्याकडे तक्रार नोंदवली.
विभागाने १२ सप्टेबर रोजी या विषयाची पडताळणी केली. यावेळी डाबेराव यांनी सदर रक्कम बेलूरा येथील अतिरिक्त कारभार पाहणारे दुसरे तलाठी अमोल सोपान गीते (वय ३६) यांना देण्याचे सांगितले. या प्रकरणी २२ सप्टेंबरला लाचलुचपत विभागाने सापळा रचून पुन्हा या प्रकरणाची पडताळणी पंचा समक्ष करण्यात आली. यावेळी देखील तलाठी डाबेराव यांनी रक्कम आणली असल्यास तलाठी गीते यांच्याकडे देण्याचे सांगितले. तक्रारदाराच्या हालचालीवर शंका आल्याने दोन्ही तलाठ्यांनी ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिला.













