देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतात कपाशी प्लॉटचे काम करत असतांना एका ६० वर्षीय इसमाने १३ वर्षीय मुलीला खोपीत ओढत नेवून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील आरोपी व फिर्यादीचे शेत एकमेकाच्या शेताला लागून आहे. या दोन्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कपाशी प्लॉट घेतले आहेत. त्यामुळे फिर्यादी व तिची १३ वर्षाची मुलगी शेतात प्लॉटचे क्रॉसिंग करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांच्या कडील क्रॉसिंग करण्याची पावडर आटोपली होती. म्हणून मुलीच्या आईने सिडची पावडर आणण्यासाठी मुलीला शेजारच्याकडे पाठविले. सिडची पावडरची डबी आणण्यासाठी ती गेली असता आरोपीने पीडित मुलीला वाईट उद्देशाने हात धरूनगुन्हा दाखल करुन आरोपीस अटक!ओढत खोपीत नेले आणि तिचा विनयभंग केला.
या घटनेची माहिती मुलीने आईला सांगितल्याने लगेच मुलगी व तिची आई आणि वडील यांनी पोलीस स्टेशनला जावून तक्रार दाखल केली या तक्रारीवरुन ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार जारवाल यांनी आरोपी सदाशिव वसाराम चव्हाण यांच्याविरुद्धकलम ७४ BNS सहकलम ८, १२ बालकाचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दुय्यम ठाणेदार जारवाल हे करीत आहेत.











