पिंपळगाव राजा येथील साडे नऊ वर्षीय चिमुकलीला चिकन सेंटरच्या दुकानात बोलावून केला लैंगिक अत्याचार; आरोपी रेहान खान अटकेत!

STATE NEWS: पाणी पिण्याचा बहाणा करून एका तरुणाने तिच्या घरात घुसून तिच्या वर जबरदस्ती….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा गावात एका साडेनऊ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रेहान खान मुक्तार खान (वय २४) याला अटक केली आहे. ही घटना १४ मे २०२५ रोजी उघडकीस आली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला नांदुरा तालुक्यातील वसाडी येथून ताब्यात घेतले आहे.

पिंपळगाव राजा येथील पेठपुरा परिसरात राहणारी नऊ वर्षीय मुलगी आपल्या घराजवळील किराणा दुकानात अंडी खरेदी करण्यासाठी गेली होती. याच परिसरात चिकन सेंटर चालवणाऱ्या रेहान खान याने मुलीला ५० रुपयांचे आमिष दाखवून आपल्या दुकानात बोलावले. त्याने तिथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार घरी आपल्या कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी तात्काळ पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात धाव घेत रेहान खानविरुद्ध तक्रार नोंदवली.

चिखलीत सरकारी योजनांसाठी पैसे मागणाऱ्या दलालांवर “बुलडोझर पॅटर्न”ने कारवाई करणार- आ. सौ. श्वेताताई महाले पाटील

पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. प्राप्त माहितीनुसार, आरोपी रेहान खान हा पीडित मुलीच्या समाजाचाच आहे. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपीला नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातून अटक केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “पिंपळगाव राजा येथील साडे नऊ वर्षीय चिमुकलीला चिकन सेंटरच्या दुकानात बोलावून केला लैंगिक अत्याचार; आरोपी रेहान खान अटकेत!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!