जिल्हा नियोजन समिती बैठकीदरम्यान शिवसेनेचे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकाच्या घुसण्याचा प्रयत्न!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज (२६ सप्टेंबर) पालकमंत्री मकरंद आबा पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक सुरू होती.

या बैठकीस जिल्ह्यातील बहुतेक लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान, दुपारी उबाठा येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

शिवसैनिकांनी ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या यांसारख्या मागण्या करत घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यानंतर, निवडक शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्याची परवानगी देण्यात आली.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!