चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) येळगाव धरणावर ८० स्वयंचलित दरवाजे बसविल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात बुलढाणा,चिखली आणि मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरते.परिणामी उभी पिके नष्ट होतात,तर शेतजमीनही खरडून जाते.या समस्येवर अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे स्मरणपत्र देत केली होती.यावर चार गेट पावसाळ्यात कायमस्वरुपी खुले ठेवू जेनेकरुण स्वयचंलीत गेट वर दाब येवून एकाचवेळी भिंत फुटल्यासम गेट खुलनार नाही व तलावात साठणारे पाण्याचा विसर्ग सुरु राहील असे अश्वासन नगर परिषद बुलढाणा यांनी दिले होते.मात्र काल झालेल्या बुलढाणा येथील पावसामुळे येळगाव धरणावरील स्वयंचलीत गेट वर दाब निर्माण होवून एकाचवेळी अनेक गेट खुलल्याने मोठा पुर पैनगंगा नदिला येवून नदिकाठच्या शेतकऱ्यांचे झाले आहे.याबाबत नगर परीषद बुलढाणा व जिल्हा प्रशासनाने उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाचे पालन केले नसल्याने व शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यानेच शेतीपीकाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून शेती पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने भल्या पाहटेच विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे यावेळी विनायक सरनाईक, नितिन राजपुत,शिवाजी सांडू देवडे,मोजिन पिंजारी,प्रल्हाद देवडे,गणेश पुरुषोत्तम भोलाने,समीर जमदार,
शरद शेळके,शेख जफर शेख रजक,फिरोज खान पठाण,
शेख इस्माईल,शेख रफिक कलाल
प्रवीण कस्तुरे,शेख अन्सार शेख अझीझ,शेख अयाज शेख नजीर,
शेख सत्तार शेख कादीर,शेख इसाक शेख शाफिर,
शेख अशपाक शेख शाफिर,
शिवनारायण पवार,समाधान सुरडकर,भगवान देवरे,दिलीप खेडेकर,शेख महेबुब शेख इस्माईल,प्रकाश पवार,अरुण कस्तुरे,आयुष शेळके,शेख शफीक कलाल,नामदेव सुरडकर,त्र्यंबक कस्तुरे,मदन शिरसाट,श्रीराम शेळके यांच्यासह शेतकरी आंदोलनात बसले आहेत जो पर्यंत प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहिल अशी भुमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे
“आमच्या पिकांचा बळी देऊन कोणाचं पोट भरणार?” पैनगंगा काठच्या शेतकऱ्यांचा सवाल; स्वयंचलित गेटमुळे पिकांचे प्रचंड नुकसान, संतप्त शेतकरी शेतात आंदोलनात …















