चिखली (ऋषि भोपळे – बुलडाणा कव्हरेज न्युज)शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण तापले आहे. सध्या कोण होईल या सर्कलचा सदस्य, याबाबत जनतेत उत्सुकता असून सोशल मीडियावर आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोलमधून मतदारांची दिशा स्पष्ट होताना दिसते आहे.या सर्कलसाठी भाजपकडून तब्बल तीन इच्छुक रिंगणात आहेत. विष्णु घुबे, कृष्णा सपकाळ आणि संतोष काळे पाटील या तिघांपैकी पक्ष कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकतो हे येणारा काळच सांगणार आहे.
विष्णु घुबे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले व जुन्या कार्यकर्त्यांमध्ये वजनदार नाव म्हणून विष्णू घुबे यांची ओळख आहे विष्णु घुबे हे देऊळगाव घुबे येथील राहणारे आहेत. सततचा जनसंपर्क आणि वरिष्ठ नेत्यांशी जवळीक या विष्णू मामा घुबे यांच्या जमेच्या बाजू आहेत. दुसरे इच्छुक कृष्णा सपकाळ हे भाजपचे जिल्हा सचिव आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाने ठसा उमटवला आहे. पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले नेतृत्व म्हणून सपकाळ यांची ओळख असून ते अंचरवाडी येथील राहणारे आहेत.भाजपकडून उमेदवारीच्या शर्यतीत असलेले आणखी एक नाव म्हणजे संतोष काळे पाटील. संतोष काळे हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत. याआधी युवा मोर्चाच्या चिखली तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थनपणे सांभाळली आहे, काळे पाटील यांचाही लोकसंपर्क दांडगा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून कृष्णा मिसाळ आणि डॉ .विकास मिसाळ या दोघांची नावे चर्चेत आहेत. कृष्णा मिसाळ सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून शेतकरी वर्गाशी सातत्याने संपर्कात राहतात. डॉ.विकास मिसाळ हे डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस असून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत ते कायम पुढे राहतात. शिवसेना शिंदे गटाकडून इसरूळ येथील माजी सरपंच संतोष भुतेकर यांचे नाव चर्चेत आहेत. भुतेकरांची ओळख हटक्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. सामान्य वर्गात त्यांची चांगली ओळख अवैध रेतीच्या विरोधात ते सातत्याने आक्रमक भूमिका घेतात. शिंदे शिवसेनेशी भाजपशी युती होते की नाही यावर संतोष भुतेकर यांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान स्ट्रॉ पोलकडून घेण्यात आलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणात भाजपचे विष्णू घुबे आणि कृष्णा सपकाळ जवळपास बरोबरीत आहेत. दोघांना २७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
असा आहे प्राथमिक सर्वेचा अंदाज
विष्णु मामा घुबे २७.५६%
कृष्णा सपकाळ २७.५६%
कृष्णा मिसाळ २०.५३%
संतोष काळे पाटील ९.९%
संतोष भुतेकर ५.२७%
डॉ.विकास मिसाळ ५.०३%
शेनफडराव घुबे १.३६%
शंतनू बोंद्रे १.१२%
श्याम पाटील भुतेकर १.४%
मनोज खेडेकर १.०४ टक्के
(हे प्राथमिक अंदाज असून यात थोडाफार बदल होऊ शकतो)
या निकालांवरून भाजपच्या तीन इच्छुकांचे एकत्रित मतांचे प्रमाण 65 टक्के इतके असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे या सर्कलमध्ये भाजपचे वर्चस्व दिसून येत असले, तरी तिन्ही इच्छुकांमध्येच खरी रस्सीखेच होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपमध्ये अधिकृत उमेदवार ठरवताना अंतर्गत समन्वय साधणे आवश्यक ठरणार असून, तिन्ही इच्छुकांमध्ये पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल.एकंदरीत, शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कलवर भाजपचा मजबूत पायंडा दिसत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसची लढतही तितकीच जोरदार राहणार आहे. अंतिम उमेदवार निश्चितीपर्यंत या राजकीय समीकरणांची रंगत वाढतच जाणार आहे….














