
Share Market Investment: “चालणारा माणूस आणि धावणारा घोडा कधीच म्हातारा होत नाही,” असे आपण अनेकदा ऐकले असेल. याचा अर्थ असा की जर तुमच्या पैशांची सतत योग्य रीतीने गुंतवणूक होत राहिली, तर त्यातून चांगला नफा मिळू शकतो आणि महागाईवर मात करता येते. म्हणजे अशा गुंतवणुकीचा अर्थ फक्त चालू पैशांचे फिरणे आहे आणि जर ते फिरत राहिले तर ते कालांतराने महागाईवर मात करण्यास सक्षम असतात.
जोखीम घेणे का गरजेचे आहे?
तुम्हाला माहित आहे का? आपल्या आयुष्यात एक मोठे सत्य आहे ते म्हणजे – “जोखीम न घेणे, हाच सर्वात मोठा धोका आहे.”
उदाहरणार्थ, माझ्या आजोबांनी १९७० साली एका ठिकाणी जमीन खरेदी केली. त्या वेळी ती केवळ काहीशे रुपयांना मिळाली होती, पण आज तिची किंमत २५ लाखांपर्यंत वाढली आहे. जर त्यांनी तो पैसा बँकेत ठेवला असता, तर आज त्यातून फारसे काही साध्य झाले नसते.
याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने फक्त शेअर बाजारातच गुंतवणूक करावी. पण जोखीम घेणे गरजेचे आहे. मग तुम्ही ज्या क्षेत्रात जाणकार आहात, त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.
जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय?
प्रत्येक नवीन तंत्रज्ञान किंवा संकल्पना सुरुवातीला लोकांना अवघड वाटते. उदाहरणार्थ,
- लोकांना सुरुवातीला बैलगाडीचा अविश्वास वाटला.
- सुरुवातीला लोखंडी नागर शेतात वापरण्यास शेतकरी तयार झाले नव्हते.
- सायकल आल्यावर काहींनी ती वापरण्याची जोखीम पत्करली नाही.
- गाड्या, ट्रेन, विमाने आली, तेव्हाही लोकांना धाडस करावे लागले.
मात्र, यातला धोका व्यवस्थापित करता आला आणि तो हळूहळू संधीमध्ये बदलला.
शेअर बाजाराचा भविष्यातील ट्रेंड काय म्हणतो?
सध्या भारतात फक्त ३% लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात. पण येत्या २० वर्षांत हे प्रमाण २०% पर्यंत वाढेल. त्यामुळे आजच संधी ओळखून गुंतवणुकीचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
गुंतवणूक कधी करावी?
- जेव्हा तुमच्या गरजेचे खर्च भागवून उरलेला पैसा असतो.
- जर तुम्ही भविष्यातील मोठ्या खर्चाची योजना करत असाल.
- शेअर बाजाराशिवाय इतर गुंतवणुकीचे मार्ग (मिळकत, म्युच्युअल फंड, एफडी, सोने, स्टार्टअप्स) देखील आहेत.
गुंतवणूक ही केवळ जोखीम नसून, योग्य नियोजन केल्यास ती संपत्ती वाढवण्याचा प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे योग्य माहिती आणि अभ्यास करून तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. एक लक्षात असुद्या; शेयर बाजार हा गुंतवणुकीसाठी आहे. सट्टा खेळण्यासाठी नाही. बरेच लोक लवकर पैसे कमावण्याच्या नादात ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवतात आणि कर्जबाजारी होतात. हे टाळण्यासाठी शेयर बाजाराकडे आपण फक्त गुंतवणूक म्हणूनच बघायला हवे.
📌 शेअर बाजार आणि गुंतवणुकीसंबंधी अधिक माहितीसाठी आमचे अनुसरण करा! 🚀
1 thought on “Share Market Investment: चालणारा माणूस आणि धावणारा घोडा कधीच म्हातारा होत नाही; जाणून घ्या शेअर बाजारात का आणि केव्हा गुंतवणूक करावी?”