चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): पोराच्या सासरवाडीत बाप – लेकाने धिंगाणा घातला.. एवढंच नाही तर स्वतःच्या सासऱ्याला चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यात उघडकीस आली आहे.

जाहिरात ☝️…
गजानन शंकर घेवंदे( ४७) रा.सावरगाव डुकरे यांनी चिखली पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घातले आहे त्यांची मोठी मुलगी सानिका हिचे लग्न गेल्या तीन वर्षांपूर्वी निलेश वानखडे सोबत झाले आहे. तिला एक मुलगी आहे. दुसरी वेळेस माझी मुलगी गर्भवती आहे. मी गेल्या आठ दिवसापूर्वी बाळंतनासाठी मुलीला माझ्याकडे आणले आहे.मात्र २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जावई निलेश वानखडे याचा फोन माझ्या मुलीला आला त्यांनी तिला फोनवर शिवीगाळ केली. त्यांची दोघांची बाचाबाची सुरू होती. त्यानंतर रात्री दहा वाजताच्या सुमारा जावई निलेश वानखडे , मुलीचा सासरा गणेश वानखडे (रा.सोमठाण ता.लोणार)हे दोघे मोठ्या चार चाकी गाडीने माझ्या घरी आले होते. गाडीतून उतरताच त्यांनी मला माझ्या मुलीला शिवीगाळ सुरू केली. तेव्हा मुलीचा सासरा गणेशा दारू पिलेला होता म्हणून मी माझा चुलत भाऊ भारत दिनकर घेवंदे असे दोघांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र जावई निलेशाने सोबत आणलेला चाकूनी मला मारण्याचा प्रयत्न केला. तो चाकू मी अडविला तर निलेश च्या हाताला तो लागला. भारत घेवंदे त्याला पकडण्यासाठी आल्यानंतर दोघे बाप – लेकांनी मला व भाऊ भारत यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जावई गणेशने भाऊ भारत याच्या तोंडावर बुक्क्या मारल्या आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. असेही गजानन घेवंदे यांनी चिखली शहर पोलिसात दिलेल्या आपल्या तक्रारीत म्हटले आहे.पोलिसांनी निलेश वानखेडे व गणेश वानखेडे या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.