अंढेरा (नंदकिशोर देशमुख- बुलडाणा कव्हरेज न्युज): महावितरण विभागात कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू वायरमन भूषण पन्हाळे यांची बदली देऊळगाव राजा येथे झाली आहे. त्यांच्या सन्मानार्थ अंढेरा ग्रामस्थांच्या वतीने भावनिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम अंढेरा गावाच्या ग्रामदैवत श्री औंढेश्वर महाराज मंदिर प्रांगणात पार पडला. या वेळी गावातील नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातील प्रमुख मान्यवर –
- प्रा. दिलीप सानप,
- मा.स. संतोष नागरे,
- रामेश्वर वाघ, नितीन सानप, राजू विभोते, बंडू देशमुख,
- गजानन सानप, कैलास नागरे,
- पंचायत समिती सदस्य राजा इंजिनीयर अमोल इंगळे,
- मा.स. संतोष सानप पाटील, गजानन तेजनकर,
- माधव सानप, कडुबा सानप, मा.स. रवी सानप,
- वायरमन पप्पू राठोड, संजय डोईफोडे, धामोदर आणा,
- सुनील पवार, रवी तेजनकर, रामा मगर, कैलास देशमुख आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रूपेश शक्करगे, गजानन वाघ व विष्णू बनकर यांनी उत्तम प्रकारे केले. गावकऱ्यांच्या वतीने पन्हाळे साहेबांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वेळोवेळी दाखवलेली तत्परता, संकटसमयी उभं राहणं आणि गावाशी जोडलेली आपुलकी याबद्दल गावकऱ्यांनी मनापासून कौतुक केलं.
गावातील सर्व पत्रकार बांधवही या प्रसंगी उपस्थित होते आणि त्यांनी पन्हाळे साहेबांच्या कार्याला मनापासून सलाम केला. संपूर्ण कार्यक्रम गावकऱ्यांच्या प्रेम, सन्मान आणि कृतज्ञतेच्या भावनेने भरलेला होता.