बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – गावात वाढणारी अवैध दारू विक्री आणि व्यसनाधीनता यामुळे त्रस्त झालेल्या वानखेड येथील महिला भगिनींनी थेट शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा फोडून सांगितल्या.अनेक महिला अक्षरशः तुपकरांसमोर रडल्या.. यावेळी तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले,
“आमचं कुटुंब उद्ध्वस्त होतंय साहेब… मुलं, नवरे दारूच्या आहारी गेलेत… काहीतरी करा!” अशा शब्दांत महिलांनी तुपकर यांच्यासमोर आपल्या संतप्त भावना मांडल्या.
गावातील तरुण वर्ग, अगदी कुटुंब प्रमुखही व्यसनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. त्यामुळे घरातला गाडा कोसळतोय, मुलांचं भवितव्य अंधारात जातंय, हे महिलांनी तुपकर यांच्या समोर ठामपणे सांगितलं.
तुपकर यांनीही या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत, थेट पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून “गावातली अवैध दारू विक्री तात्काळ थांबवा, अन्यथा आम्ही महिलांबरोबर आक्रमक पणे रस्त्यावर उतरू!” असा कडक इशारा दिला.