शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांचा सरकारवर जोरदार घणाघात
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – मेहकर : महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाला सर्व काही सुरळीत सुरू असल्याचा भ्रम आहे. मात्र प्रत्यक्षात राज्यातील परिस्थिती वेगळी असून ग्रामीण भाग, खेडी-पाडे, शहरे आणि गल्लोगल्ली प्रचंड निराशा व असंतोषाने भरलेली आहेत, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत केला.
विरोधी पक्षाच्या ठरावांची खिल्ली उडवली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना आमदार खरात म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी वेगळाच चष्मा लावला आहे. त्यांच्या मते सर्व काही ठीक आहे; पण सामान्य माणसाच्या मनात प्रचंड जळजळ असून डोळ्यांत वादळ आहे. राज्यातील प्रत्येक नागरिक अस्वस्थ आहे, मात्र सरकारकडे याचे उत्तर नाही.
शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कॅश क्रॉपचे दर घसरले असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी गंभीर परिस्थिती असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विदर्भ आणि मराठवाड्यात मदर डेअरी प्रकल्प आणण्याचा करार झाला असला, तरी प्रत्यक्षात या प्रकल्पांचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
‘योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत. प्रत्यक्षात शेतकरी आणि पशुपालकांना त्याचा कोणताही ठोस फायदा मिळत नाही,’













