शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्यूज) — चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून भाजपा नेते विष्णु घुबे यांनी सर्कलमधील विविध गावांना भेटी देत कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली असून पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.
सर्कलमधील बेराळा, येवता, मुरादपूर, भरोसा आणि इतर गावांमध्ये झालेल्या भेटीत गावकऱ्यांनीही निवडणुकीसंदर्भात आपली मते व्यक्त केली. आरक्षण जाहीर झाल्याने आता या भागातील राजकीय वातावरण तापू लागले असून सर्वच पक्षांनी तयारीस सुरुवात केली आहे.
शेळगाव आटोळ सर्कलमध्ये राजकीय हालचालींना वेग; भाजपा नेते विष्णु घुबे यांचा दौरा…
Published On: October 20, 2025 10:11 am













