Advertisement Advertisement

पूजा करण्याच्या बहाण्याने सोने लुबाडणाऱ्या दोन भामट्यांना अटक..!स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १० लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) हिवरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूजेच्या नावाखाली हातचलाखीने भाविकांचे सोने लुबाडणाऱ्या दोन भामट्यांना स्थागुशाच्या पथकाने अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून १० लाख ४१ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज १ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

खामगाव तालुक्यातील बोथा कोळी येथील परशुराम लक्ष्मण कांडेलकर यांनी ३० सप्टेंबर रोजी हिवरखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २८ सप्टेंबर रोजी आरोपींनी फिर्यादीशी परिचय करून व त्यांच्या मुलाचा हात पाहून, मुलाच्या जिवाला धोका असल्याची बतावणी केली. तसेच धोका टाळण्यासाठी

पूजेचे आयोजन करण्यास सांगितले. भामट्याच्या सांगण्यानुसार कांडेलकर यांनी मुलाच्या जिवाच्या भितीने पूजेचे आयोजन केले. या वेळी आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या घरी होमहवन करुन, पत्नीचे २१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लोट्यात ठेवण्याचे सांगितले.

त्यानंतर भामट्याने पूजे दरम्यान हातचलाखीने मंगळसूत्र त्यातून काढून घेतले. तसेच पूजेची दक्षिणा म्हणून पाच हजार रुपये घेत फसवणूक केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास करून तीन आरोपी निष्पन्न केले. त्यापैकी सुनील उदयभान मुसळे (वय ३९) व संदीप उत्तम महापुरे (वय ३९) दोघे रा.

खांडवा ता. मोताळा, जिल्हा बुलडाणा यांना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून अडीच ग्रॅम सोन्याची पोत, एक कार व दोन मोबाइल असा एकुण १० लाख ४१ हजार ३४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना हिवरखेड पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक यशोदा कणसे, पोहेकॉ. राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, पोना. विजय वारुळे, पोकॉ. मंगेश सनगाळे, राजेश गडकर, सतीश नाटेकर, चालक पोहेकॉ समाधान टेकाळे, तांत्रीक विभागाचे पोहेकॉ. राजू आडवे व पोकॉ. कैलास ठोंबरेयांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!