“आमच्या नावाने दिलेला रिपोर्ट मागे घे” नाहीतर…!अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, ती तात्काळ मागे घे, अशा दबावातून दगड व काठीने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना शेळगांव आटोळ येथे ३ जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेळगांव आटोळ येथील विजय नारायण सुरडकर (वय ३२) हे आपल्या शेतात काम करत असताना आरोपींनी त्यांना गाठत, “आमच्या नावाने दिलेला रिपोर्ट मागे घे” अशी धमकी दिली. यावर फिर्यादीने “मी रिपोर्ट मागे घेणार नाही, कोर्टात जे होईल ते होईल” असे स्पष्ट सांगताच आरोपी संतप्त झाले.

यानंतर आरोपींनी डोक्यात दगड मारून व काठीने जबर मारहाण करत विजय सुरडकर यांना जखमी केले. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी आलेले भगवान बनसोडे यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार देढे यांनी आरोपी किशोर दाजीबा सुरडकर, विकास किशोर सुरडकर, विशाल किशोर सुरडकर (रा. शेळगांव आटोळ) व गणेश बोर्डे (रा. चिखली) यांच्याविरुद्ध कलम 118(1), 351(2), 352, 3(5) भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!