बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलडाणा जिल्ह्यातील एका तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात १९ जुलै रोजी एका अविवाहित युवतीची सिझर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. या प्रसूतीत तिने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे, या युवतीसोबत कोणताही नातेवाईक उपस्थित नव्हता.घटनेची गंभीर दखल घेत ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने स्थानिक पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. सदर युवतीची प्रकृती सध्या स्थिर असून, तिच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.
तिची पुढील वैद्यकीय तपासणी आणि देखभाल आवश्यक असल्यामुळे तिला २० जुलै रोजी बुलडाणा किंवा अकोला येथील उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता हिवसे यांनी दिली.या प्रकरणाची चौकशी पोलीस करत असून, युवतीच्या गरोदरपणामागील कारणांची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
1 thought on “बिना लग्नाच्या मुलीने दिला एका बाळाला जन्म; रुग्णालय प्रशासनाची पोलिसांत तक्रार…”