नातं तुटल्याचा राग; प्रेम प्रकरण बापाला कळले!तरुणाने विद्यार्थिनीचा पाठलाग करून बदनामी अन्..!

शिक्षकाच्या जाचाला कंटाळून १० वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहून ठेवली अन् चिठ्ठीत गंभीर आरोप…

छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) – कॉलेजमध्ये ओळख झालेल्या २० वर्षीय तरुणीने प्रेमसंबंधाबाबत वडिलांना माहिती मिळाल्यानंतर प्रियकराशी बोलणे बंद केले. यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने तिचा पाठलाग सुरू केला, मोबाइलवरून वारंवार त्रास दिला आणि क्लासमधील मुलांना कॉल करून तिची बदनामी केली. अखेर त्रस्त झालेल्या तरुणीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी परिसरात राहणाऱ्या पीडित तरुणीने पोलिसांकडे फिर्याद दिली. या प्रकरणात प्रेम पांडुरंग घुले (रा. सलामपुरेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कॉलेजमध्ये दोघांची ओळख झाल्यानंतर संबंध वाढले होते. मात्र ही बाब मुलीच्या वडिलांना कळल्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे थांबवले.

तरीही प्रेमने जून २०२५ पासून तिच्या आई-वडिलांना फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली.शनिवारी (१६ ऑगस्ट) सकाळी १० वाजता त्याने क्लासमधील मुलांना फोन करून मुलीबद्दल अपमानास्पद बोलले, तर रविवारी (१७ ऑगस्ट) सकाळी तिच्या घरासमोर येऊन थांबला, असे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!