शिक्षकाच्या जाचाला कंटाळून १० वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहून ठेवली अन् चिठ्ठीत गंभीर आरोप…

शिक्षकाच्या जाचाला कंटाळून १० वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहून ठेवली अन् चिठ्ठीत गंभीर आरोप…

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): वसाडी येथील विनायक महादेव राऊत (वय १५) या १० वीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १ जुलै रोजी उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

विनायकने त्यांच्या शेतातील नव्याने बांधलेल्या घरात एंगलला दोरी लावून गळफास घेतला. आत्महत्येच्या वेळी त्याच्या खिशात एक चिठ्ठी आढळली असून त्यात त्याने वर्गशिक्षक सूर्यवंशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या चिठ्ठीत त्याने लिहिले आहे की, “शिक्षक वारंवार माझ्या आईवडिलांबद्दल अपशब्द वापरत होते, अपमान करत होते, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.”

सख्या दोन बहिणी मैत्रिणींकडे जाऊन येतो, असे घरी सांगून गेल्या. त्यानंतर परत आल्या नाही….

या शिक्षकावर यापूर्वीही वर्तनासंदर्भात तक्रारी झाल्या होत्या. काही काळासाठी त्यांची बदलीही करण्यात आली होती. मात्र नंतर पुन्हा त्यांची नियुक्ती या शाळेत करण्यात आली. वेळीच कठोर कारवाई झाली असती, तर विनायकचे प्राण वाचले असते, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

घटनेनंतर पिं. राजा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले असून, पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेतील शिक्षकांच्या आचारसंहितेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, दोषी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “शिक्षकाच्या जाचाला कंटाळून १० वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहून ठेवली अन् चिठ्ठीत गंभीर आरोप…”

Leave a Comment

WhatsApp Join Group!