दुचाकीस्वाराचा अपघातात जागीच मृत्यू : महाबीज परिसरात रात्रीची दुर्दैवी घटना….

मेहकर-चिखली मार्गावर भीषण अपघात: दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली-जालना रोडवरील महाबीजजवळ काल (३० जुलै) रात्री १०.१५ च्या सुमारास दुचाकी अपघातात एक दुर्दैवी घटना घडली.

या अपघातात दुचाकीस्वार इम्रान खान सनाउल्ला खान (वय ४०, रा. खामगाव, सध्या गजानन नगर, चिखली) यांचा मृत्यू झाला.इम्रान खान हे आपल्या हीरो एचएफ डिलक्स दुचाकीवरून चिखलीहून मेहकर फाट्याकडे जात होते. दरम्यान, महाबीज परिसरात त्यांचा अपघात झाला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अंधार, वाहनाचा वेग, अथवा इतर वाहनाची टक्कर या शक्यतांबाबत पोलिस तपास करत आहेत.अपघातानंतर इम्रान यांचे शव चिखली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले आहे. चिखली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!