लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा त्रास वाढत चालला असून, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून हद्दपार करावे, अन्यथा आठ दिवसांनंतर त्यांना नगर पालिकेत आणून सोडले जाईल, असा इशारा शिवसेना उबाठाने दिला आहे.
या संदर्भात जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे व शहणमुख गजानन जाधव यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. शहरात हजारो
लोणार : शहरातील भटकी कुत्री.
भटके कुत्रे फिरताना दिसत आहेत. अनेक नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी लाखो रुपयांचा खर्च दाखवला जातो.
परंतु, प्रत्यक्षात अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया थांबली आहे. शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया आठ दिवसांत सुरू करण्यात यावी, अन्यथा त्यांना नगर पालिका कार्यालयात आणून सोडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना डॉ. गोपाल बछिरे, गजानन जाधव यांच्यासह अॅड. दीपक मापारी, गोपाल मापारी, लुकमान कुरेशी, रवींद्र सुटे, श्रीकांत मदनकर, तानाजी अंभोरे, अशपाक खान, फहीम खान, वासिम शेख उपस्थित होते.













