मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): घुस्सर ता. मोताळा येथील विटभट्टीवर काम करणारी कु. जमुना रेवासिंग बारेला (वय १८ वर्षे ११ महिने) ही तरुणी २७ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता शौच्यास जाते असे सांगून घरातून निघून गेली असून अद्याप तिचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.
या प्रकरणी तिचे वडील रेवासिंग सिताराम बारेला (वय ४०) रा. कारपूर, जि. खंडवा (मध्यप्रदेश), सध्या मुक्काम घुस्सर विटभट्टी यांनी बोऱाखेडी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. जमुना हिचा रंग गोरा, उंची सुमारे ५ फूट, बांधा सडपातळ असून अंगात कथ्था रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात पांढऱ्या सॅन्डल असल्याचे वर्णन पोलिसांकडून देण्यात आले आहे.
नातेवाईक व परिसरात शोध घेऊनही ती आढळून न आल्याने पोलिसांनी मिसिंग नोंद घेतली असून पुढील तपास पोहेकॉ. विजय सुरडकर करीत आहेत.











