मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :
सुलतानपूर ते राजेगाव मार्गावर शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
मृत व्यक्तीचे नाव धीरज दिनकर भालेराव (वय ४०, रा. राजेगाव, ता. सिंदखेड राजा) असे आहे. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते, मात्र काही वेळानंतर त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर टिप्पर चालक वाहन सोडून पसार झाला. या प्रकरणी मृतकाच्या भावाने मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.