मेहकर बसस्थानकावर गोंधळ! भांडण सोडविणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण..! दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर बसस्थानकावर बसमधील सीटवरून झालेल्या वादात हस्तक्षेप करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला दोन महिलांनी चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना २४ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.


दिवाळी निमित्त बसस्थानकावर वाढलेल्या गर्दी आणि चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली होती. त्याचवेळी, मेहकर-जळगाव बसमध्ये सीट मिळण्यावरून दोन महिला प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद मिटवण्यासाठी एक महिला पोलीस कर्मचारी पुढे गेली असता, त्या दोघी प्रवाशांनी पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.


या प्रकरणी दोन्ही महिलांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!