Advertisement Advertisement

मायलेकीचे मृतदेह नदीपात्रात सापडले..

पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) – सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड येथील २८ वर्षीय विवाहित महिला व तिची ४ वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी दोघींचेही मृतदेह पूर्णा नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवखेड येथील निळकंठ भोसले यांची पत्नी गीता निळकंठ भोसले (वय २८) व मुलगी प्रियांशी (वय ४) या २९ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता बाहेर पडल्या. बराच शोध घेतल्यानंतरही त्यांचा काही पत्ता लागला नाही.

या संदर्भात नातेवाईकांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
शेवटी १ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील तळणी पोलीस ठाणे हद्दीतील वाघाळा येथे पूर्णा नदीच्या पात्रात मुलीचा मृतदेह तर किरला येथे आईचा मृतदेह आढळून आला. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, मंठा येथे पाठवले आहेत.


या घटनेबाबत तळणी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार संजय मोरतोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. संतोष शेळके करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!