अंढेरा (नंदकिशोर देशमुख: बुलडाणा कव्हरेज न्युज)गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेलं सावखेड नागरे गाव अखेर विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहे. सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कांयदे यांच्या सक्रिय पुढाकाराने गावातील अनेक रखडलेली कामे मार्गी लागत आहेत. गावकरी देखील आता समाधान व्यक्त करत असून, “खऱ्या अर्थाने आमचा आवाज कोणीतरी ऐकतोय,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.२५ वर्षांची मागणी अखेर पूर्णतेच्या वाटेवरगावाच्या शेजारील नदीला दरवर्षी येणाऱ्या पूराचा धोका लक्षात घेता, पूर संरक्षण भिंतीसाठी गेल्या २५ वर्षांपासून मागणी होत होती. विविध निवेदने देऊनही हे काम कायमच दुर्लक्षित राहिले. मात्र, आमदार मनोज कांयदे यांनी गावाला भेट देऊन हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचं वचन दिलं आणि केवळ तीन महिन्यांच्या आतच यावर प्रत्यक्ष काम सुरू झालं आहे.विकासाची नवी दिशागावातील
नागरिक अनेक समस्यांमुळे त्रस्त होते –
पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, सुरक्षेची अभाव यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी होती. पण आमदार कांयदे यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेत, संबंधित विभागांना निर्देश देऊन कामांना गती दिली आहे. त्यामुळे गावात विकासाच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे.गावकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसादगावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “आम्ही अनेक वर्षांपासून विकासाची वाट पाहत होतो. आज आमदार मनोज भाऊंच्या रूपाने आमचं दुःख कोणीतरी ऐकतंय.”
या मान्यवरांचा सहभाग….
या विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी गावचे सरपंच मीना संजय मोरे, जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंडे, प्रा. दिलीप सानप, ग्रा.स. सदस्य सुभाष नागरे, प्रल्हाद जायभाय, योगेश नागरे, दिलीप जायभाये, शिक्षण समिती अध्यक्ष दगडू जायभाय, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश नागरे, तसेच विजय नागरे, श्रीराम नागरे, भास्कर लहाने यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.”गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करतोय, याचा आम्हाला आनंद आहे. आमदार मनोज कांयदे यांचे मनापासून आभार!” गावकऱ्यांची भावना