चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलडाणा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर कासी साहेब आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. मनोज कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल भानुदास थुट्टे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिखली तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या ध्येयधोरणानुसार युवकांच्या विकासासाठी काम करण्यासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे. विशाल थुट्टे हे मूळचे भरोसा (ता. चिखली) येथील असून, त्यांनी यापूर्वीही सामाजिक आणि युवकांशी संबंधित अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
नवीन जबाबदारी स्विकारल्यानंतर विशाल थुट्टे यांनी आभार मानत पक्षवाढीसाठी व युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी निष्ठेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नियुक्ती पत्र देताना सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे, चिखली तालुका अध्यक्ष रुपेश रिंढे या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते…
त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.













