शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडीचा सिंदखेडराजा येथे मा. मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा! रेकॉर्ड ब्रेक गर्दी…

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज ) :
या भाजप सरकारने उद्योगपतींचे तब्बल १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊनही त्यांची फसवणूक केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी सिंदखेडराजा येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा मराठा समाजाचा नव्हे, तर सर्वच जाती-धर्मातील शेतकऱ्यांचा आहे, असा ठाम इशारा मोर्चाचे प्रमुख आयोजक आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला. जर मतदारसंघातून एखादा ‘वाल्मिक कराड’ जन्माला आला, तर मग मराठ्यांचाही मोर्चा निघेल, असं ते म्हणाले.

मोर्चात विविध पक्षांचे नेते उपस्थित

या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यासह अनेक पक्षांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपस्थित प्रमुख नेते:

राहुल बोंद्रे (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)

छगनदादा मेहत्रे (शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख)

महत्त्वाच्या मागण्या पुढे…

मोर्चादरम्यान पुढील महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या:

शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करावी.

मंजूर झालेले शेतरस्ते व पांदण रस्त्यांचे काम त्वरित सुरू करावेत.

अनेक शेतकऱ्यांना मिळालेले पीकविमा मंजुरीचे पैसे अद्याप खात्यात जमा नाहीत, ते तात्काळ जमा करावेत.

माँसाहेब जिजाऊ जन्मस्थळ विकास आराखडा मंजूर करून कामाला गती द्यावी.

सावरगाव माळ स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू करावा.

साखरखेर्डा तालुका घोषित करावा.

नेत्यांचे भाषणातील मुद्दे

राहुल बोंद्रे यांनी भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना “खोटारडा मुख्यमंत्री” म्हटले आणि त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली – “सातबारा कोरा करतो” म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तो अजूनपर्यंत कोरा केलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

छगनदादा मेहत्रे यांनीही राज्य सरकारवर सडकून टीका केली. “मुख्यमंत्री अण्णाजीपंत यांचा कारभार म्हणजे लबाडा घरचं आवतण”, अशी उपमा त्यांनी दिली. काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या अजब वागणुकीवरून त्यांनी सडकून टीका केली.

एकत्र निवडणुकीची तयारी

महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवणार आहे. त्यामुळे कुणीही वेगळा निर्णय होणार अशी शंका घेऊ नये, असंही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केलं.
विधानसभा निवडणुकी नंतर पहिल्यांदा आज महाविकास आघाडीचे आज सिंदखेड राजा येथे रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली त्यामुळे आज विधानसभा निवडणुकी नंतर एवढी गर्दी जमली होती त्यात ट्रॅक्टर, बेल गाडा, शेतकऱ्यांनी आणले होते….

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराजे जाधव यांनी केले तर संचालन सतीश काळे यांनी पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!