नागपूर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) – नागपूर पोलिसांनी एका ‘लुटेरी दुल्हन’ला अटक केली आहे. समीरा फातिमा (व्यवसायाने शिक्षिका) या महिलेवर गेल्या १५ वर्षांत आठ पुरुषांशी लग्न करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक झाल्यावेळी ती तिच्या नवव्या टार्गेटला भेटत होती.
कसा होता फसवणुकीचा डाव?
समीरा फातिमा मॅट्रिमोनियल वेबसाइट्स आणि फेसबुकद्वारे पुरुषांशी संपर्क साधत असे.सुरुवातीला फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप कॉलवर बोलून मैत्री करत असे.स्वतःला घटस्फोटित आणि एका मुलाची आई असल्याचे सांगून सहानुभूती मिळवत असे.भावनिक आणि दुःखद कथा सांगून पुरुषांना आपल्या प्रेमजाळ्यात अडकवत असे.लग्न झाल्यानंतर पतीला ब्लॅकमेल करून मोठ्या रकमा उकळत असे.पैसे न दिल्यास खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असे.
मोठ्या रकमेचा व्यवहार…
तिच्या एका माजी पतीने पोलिसांकडे तक्रार केली आहे की, फातिमाने एका व्यक्तीकडून ५० लाख रुपये आणि दुसऱ्याकडून १५ लाख रुपये रोख व बँक ट्रान्सफरद्वारे उकळले.
टोळीचा संशय
प्राथमिक तपासात फातिमा एकटी नसून ती एका टोळीबरोबर काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही टोळी तिला संभाव्य सावज ओळखण्यात, फसवणूक करण्यात आणि पैसे उकळण्यात मदत करत असे. पोलिस आता या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेत आहेत.🚔 अटक कशी झाली?नागपूरमधील एका चहाच्या दुकानातून पोलिसांनी तिला अटक केली. त्यावेळी ती तिच्या नवव्या टार्गेटशी भेट घेत होती. सध्या तिच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.











