बीड बायपास वर अंबिका लॉजवर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; चार युवती त्या ठिकाणी करत होत्या बंद खोलीत….! लॉज मध्ये आल्यावर करत होत्या इशारा…

त्याने तिचे ते फोटो तिला दाखवले अन् त्यानंतर कधी वावरत, तर कधी घरात.... आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाल्टा फाटा परिसरातील अंबिका लॉजवर चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा ग्रामीण पोलिसांनी ४ जुलै रोजी रात्री छापा टाकून पर्दाफाश केला. या कारवाईत ४ युवतींची सुटका करण्यात आली असून, लॉजचा मॅनेजर आणि मालकाला अटक करण्यात आली आहे.युवती आर्थिक अडचणी व अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. या प्रकरणी मॅनेजर सुभाष फकिरा राठोड (वय ४९, रा. अमराई, बजाज हॉस्पिटल मागे) आणि लॉज मालक विश्वास शिंदे (वय ५१, रा. झाल्टा) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बीड बायपास रोडवरील अंबिका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांना मिळाली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी छाप्याचे नियोजन केले. बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवून सापळा रचण्यात आला.बनावट ग्राहकाकडून मॅनेजरने १ हजार रुपये घेऊन त्याला खोली क्रमांक १०६ मध्ये पाठवले. तिथे एका युवतीला पाठवण्यात आले.

ग्राहकाने ठरल्याप्रमाणे इशारा दिल्यावर पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. इतर खोल्यांमध्येही तपास केल्यावर आणखी ३ युवती आढळल्या. चारही महिलांची सुटका करण्यात आली.या कारवाईत ५७,९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात मोबाईल फोन, रोख रक्कम, निरोधच्या पाकिटांचा समावेश आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नरवडे, विनोद भालेराव, अंमलदार दिलीप साळवे, कपिल बनकर, ईर्शाद पठाण, सपना चरवंडे आणि भाग्यश्री चव्हाण यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “बीड बायपास वर अंबिका लॉजवर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; चार युवती त्या ठिकाणी करत होत्या बंद खोलीत….! लॉज मध्ये आल्यावर करत होत्या इशारा…”

Leave a Comment

WhatsApp Join Group!