लाज सोडली…! दीड वर्षाच्या चिमुकलीवर 55 वर्षीय नराधमाचा अत्याचार; सुनगावात माणुसकीला काळीमा…

गावातील तलावावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या पिडीत मुलीला एकटीला पाहून तिच्यासोबत...

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील सुनगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. ५५ वर्षीय मधुकर पुंजाजी हागे या नराधमाने फक्त दीड वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ५ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.चिमुकलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ती आणि तिची आठ महिन्यांची मुलगी घरी असताना, आरोपी मधुकर हागे हा त्यांच्या घरी आला. त्याने “मुलीला आंबा खायला देतो” असे सांगून तिला आपल्या घरी नेले. अर्ध्या तासानंतर मुलीला परत आणले, पण ती सतत रडत होती. तिच्या वर्तनातून काहीतरी चुकीचे घडल्याची शंका आल्याने तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले.

या घटनेनंतर चिमुकलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानुसार आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मधुकर हागेला अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नागेश मोहोळ करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!