शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)
तालुक्यातील एका गावात ३९ वर्षीय विवाहितेचा गावातीलच एका ४० वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
विवाहित महिला लग्नाच्या कामानिमित्त नातेवाइकांकडे जात असताना, समाधान महादेव देवकर (वय ४०) याने वाईट हेतूने तिचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जंलब पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.











