अंढेरा (नंदकिशोर देशमु- बुलडाणा कव्हरेज न्युज): किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह तळेगाव (ता. देऊळगाव राजा) येथील केडली शिवारामध्ये २९ जून रोजी सकाळी सापडला.
पोलीस निरीक्षक मनीषा कदम (DYSP, देऊळगाव राजा) यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत तपास सुरू आहे.
- मृत इसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे:
- लिंग : पुरुष
- वय : अंदाजे ३० ते ३५ वर्षे
- उंची : अंदाजे ५ फूट ६ इंच
- रंग : सावळा
- वेशभूषा : निळ्या रंगाचा फाटका शर्ट व निळ्या रंगाची फाटकी जिन्स
- विशेष खूण : उजव्या हातावर “महाराजांची” आकृती गोदलेली
- पायात : कोणतेही चप्पल किंवा बूट नव्हते
- स्थिती : मृतदेह अर्धवट कुजलेला असल्यामुळे ओळख पटवणे कठीण आहे
पोलीस तपास सुरू…
सध्या या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस विविध माध्यमांतून ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या इसमाबाबत कुणाकडेही काही माहिती असल्यास, कृपया खालील पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा:पो.ना. विनोद नवले – ९६७३०४१००१, पो.ना. विष्णू मोरे – ७९७७१००६५५,पो.हे. सुरेश गिरे – ८७६०४९५६३१













1 thought on “किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला; ओळख पटवण्यासाठी नागरिकांना पोलिसांचे आवाहन…”