देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज): खडकपूर्णा मोठ्या प्रकल्पातील पाण्याची पातळी जलदगतीने वाढत असून आज दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांवर बँकांचा दबाव! 19 जिल्ह्यांत नोटिसा, कर्जमाफीचा निर्णय कुठे?
प्रकल्पाची स्थिती :
- प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी : ५२०.५० मी.
- आजची पाणी पातळी : ५२०.११० मी.
- आजचा उपयुक्त साठा : ८२.०७५ द.ल.घ.मी.
- साठा टक्केवारी : ८७.८७%
- आजचा पाऊस : ४८ मिमी
- आतापर्यंतचा एकूण पाऊस : ५७१ मिमी
सध्या प्रकल्पातील एकूण ९ वक्रद्वारे प्रत्येकी ३० सें.मी. ने पाणी सोडले जात असून, नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाचे प्रमाण :
- २५४.७ घ.मी./से. (Cumecs)
- ८९८८.४ घ.फूट/से. (Cusec) आहे.
- इशारा व सतर्कता…
धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ अथवा कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग यांनी स्पष्ट केले आहे की –नागरिकांनी नदीपात्र ओलांडू नये, लहान मुले, गुरेढोरे नदीपात्रात सोडू नयेत, आणि मासेमारी तसेच नदीपात्रातून वाहतूक करू नये. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.