हृदयद्रावक घटना..! करवंड गावातील तरुण दाम्पत्याचा भीषण अपघातात मृत्यू!

लोणार-मेहकर मार्गावर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी; पावसाने रस्त्यावर आलेल्या मातीमुळे घडली दुर्घटना...

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जालना जिल्ह्यातील अंबड चौफुली येथे झालेल्या भीषण अपघातात चिखली तालुक्यातील करवंड गावातील तरुण दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

मृत दाम्पत्यामध्ये विनोद माधवराव घायवट (वय ३७) व त्यांची पत्नी मंजुळा विनोद घायवट (वय २७) यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच दोघांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, करवंड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे, दोघांच्या पार्थिवाला एकाच चितेवर अग्निदाग देण्यात आला. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.
करवंड गावातील हे कुटुंब प्रामाणिक व कष्टाळू म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने गावकऱ्यांत मोठी शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!