हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज)परिसरात सध्या सोयाबीन सोंगणी व काढणीचा हंगाम सुरू आहे. याच दरम्यान गजरखेड येथे एक दुर्दैवी घटना घडली.
गावातीलच २४ वर्षीय मजूर आकाश कचरू देवकुळे हा ३ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास संजय बाबुराव पवार यांच्या मळणी यंत्रावर सोयाबीन काड टाकण्याचे काम करत होता. काम सुरू असतानाच तो मळणी यंत्रात अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना गजरखेड शिवारात देविदास मोहन रहाटे यांच्या शेतात घडली. आकाशच्या अचानक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ आणि तीन बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे.
या घटनेची नोंद वृत्त लिहिपर्यंत साखरखेर्डा पोलीस स्टेशनला झाली नव्हती, अशी माहिती बीट जमादारांनी दिली.













