देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) –देऊळगाव राजा येथील समता कॉलनीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रभाकर श्रीराम हेलोडे या वडिलांना त्यांचा मुलगा विशाल याने मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.प्राप्त माहितीनुसार, प्रभाकर हेलोडे यांनी त्यांच्या मुलगा विशालला “घरी चल” असे सांगितले. यावर विशाल संतापला आणि वडिलांना मारहाण करत धमक्या दिल्या.
या घटनेत प्रभाकर हेलोडे जखमी झाले.प्रभाकर हेलोडे यांनी याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी विशाल विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण मि. करत आहेत.











