खामगाव (बुलडाणा): हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याच्या आरोपावरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि नणंद अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सौ. शिवानी मयूर बन्सोड, रा. समता कॉलनी, खामगाव यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींमध्ये पती मयूर रमाकांत बन्सोड (वय २९), सासरे रमाकांत धोंडोपंत बन्सोड (वय ६०), सासू आशा रमाकांत बन्सोड (वय ५५) आणि नणंद भक्ती अभिषेक चितामणी (वय २७) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी शिवाजीनगर, पंचायत समितीमागे, गंगापूर ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत.
तक्रारीनुसार, १५ मे २०२२ पासून आजपर्यंत आरोपींनी फिर्यादीचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला. माहेरच्यांशी संबंध तोडण्याचा दबाव टाकत ३ तोळे सोने व चारचाकी वाहनाची मागणी करण्यात आली. मागण्या पूर्ण न केल्यास सांभाळ न करण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. यासोबतच शिवीगाळ व धमकावण्याचे प्रकारही घडल्याचे नमूद आहे.
ही तक्रार १५ डिसेंबर रोजी रात्री ९.२५ वाजता दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल करणारे अधिकारी एनपीसी सचिन गीते असून, पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पुढील तपास हवालदार शेख जावेद करीत आहेत.











