खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गणेशपूर येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून काठीने मारहाण तसेच चाकूने हल्ला केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास राजू गजानन भालेराव (रा. गणेशपूर) हा दीपक पांडुरंग भालेराव याच्याशी वाद घालत शिवीगाळ करू लागला. वाद वाढताच लल्ला रामा बाजोडे (रा. गोमटगिरी, इंदूर) याने हातातील काठीने दीपकच्या पाठीवर, तोंडावर आणि डोक्याच्या मागील बाजूस वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी यश गणेश तायडे (रा. पारखेड, ता. शेगाव) यानेही मारहाण केली.
हिवरखेड पोलिसांनी या तिघांविरुद्ध भादंवि कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.