चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज):गुरे शेतातून हकलून दिल्या कारणाने एकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यात उघडकीस आली आहे.
झाले असे की,लक्ष्मण पुंजाजी पेहरे रा.अमोना याने आपल्या शेतात चरणारी मनोहर जयवंता शितोळे यांची गुरे शेताबाहेर हकलून दिली होती. याच कारणाने मनोहर शितोळे याने लक्ष्मण पेहरे याला ७ ऑक्टोबर रोजी तू आमचे गुरे तुझ्या शेतातून का हकलून दिली. तुझ्या बापाचे शेत आहे का ? मी तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी दिली होती. ८ ऑक्टोबर रोजी लक्ष्मण पेहरे शेताकडून घराकडे एकटा जात होता. यावेळी मनोहर शितोळे, पत्नी सौ पार्वताबाई मनोहर शितोळे, मुलगा पृथ्वीराज मनोहर शितोळे या तिघांनी लक्ष्मण पेहरे याला रस्त्यात अडवून ‘तू आमचे गुरे काल का हकलून’ दिली? या कारणावरून लक्ष्मण सोबत वाद घातला. तुझ्या बापाचे शेत आहे? का असे म्हणून मनोहर शितोळे यांनी त्याच्या हातातील कुऱ्हाड लक्ष्मण च्या कपाळावर जीवाने मारण्याचे उद्देशाने मारून लक्ष्मण याला जखमी केले. मुलगा पृथ्वीराज मनोहर शितोळे याने लक्ष्मण याच्या पायावर दगडाने मारून जखमी केले.पत्नी पार्वताबाई शितोळे हिने सुद्धा लक्ष्मण पेहरे याच्या अंगावर दगड मारले आहे.
असे लक्ष्मण पेहरे याचा भाऊ श्रीकृष्ण पेहरे यांनी अंढेरा पोलिसात ८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.











