Advertisement Advertisement

शेळगाव आटोळ सर्कलमध्ये उद्या भव्य मल्लिकार्जुन कावड यात्रा; मलगी येथे पहाटे ४.३० वाजता महाआरतीने शुभारंभ…

चिखली (उद्धव पाटील:बुलडाणा कव्हरेज न्युज): पंचक्रोशीतील शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आणणारी भव्य मल्लिकार्जुन कावड यात्रा उद्या सोमवार, ब्रह्ममुहूर्तावर आयोजित करण्यात आली आहे. संतोष काळे पाटील मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद सर्कल शेळगाव आटोळ येथे या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, पहाटे ४.३० वाजता श्री मल्लिकार्जुन संस्थान, मलगी येथे महाआरतीने यात्रेचा शुभारंभ होणार आहे.

‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषात निघणारी ही कावड यात्रा विविध गावांतून मार्गक्रमण करत शेळगाव आटोळ येथे पोहोचणार आहे. यात्रेचा मार्ग श्री मल्लिकार्जुन संस्थान, मलगी – मुरादपूर फाटा – रामनगर फाटा – मेरा चौकी खुर्द – भरोसा – देऊळगाव घुबे – मिसळवाडी फाटा – पिंपळवाडी फाटा – शेळगाव आटोळ असा राहणार आहे.

बारदरी महादेव मंदिरात अभिषेकाने समारोप….

कावड यात्रेचा अंतिम समारोप शेळगाव आटोळ येथील बारदरी महादेव मंदिरात महादेवांच्या अभिषेकाने करण्यात येणार आहे. यावेळी शिवभक्तांकडून भक्तिभावाने महादेवाचा अभिषेक करण्यात येणार असून, यात्रेच्या समारोपप्रसंगी भव्य अघोरी तांडवाचे विशेष सादरीकरण हे आकर्षण ठरणार आहे.

शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन….

या पवित्र कावड यात्रेत पंचक्रोशीतील सर्व शिवभक्त, युवक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संतोष काळे पाटील मित्र मंडळ, शेळगाव आटोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!