खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. याच दरम्यान, गुरुवारी (१७ जुलै) आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून सोन्याची पोत चोरीला गेल्याची घटना घडली आहे.टेंभुर्णा येथील गजानन बिसन सोनोने (वय ५८) यांच्या पत्नी गुरुवारी खामगावच्या आठवडी बाजारात भाजीपाला आणि इतर वस्तू खरेदीसाठी आल्या होत्या.
बाजारात मोठी गर्दी असल्याने चोरट्याने संधी साधली आणि त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली अंदाजे १५ हजार रुपये किमतीची, दोन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केली.थोड्या वेळाने पोत गायब असल्याचे लक्षात येताच महिलेने बाजारात शोधाशोध केली, मात्र चोरटा सापडला नाही.
या प्रकरणी गजानन सोनोने यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.नागरिकांना बाजारात खरेदी करताना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
1 thought on “महिलेच्या पर्समधून सोन्याची पोत चोरी; बाजारातील गर्दीचा चोरट्यांचा फायदा…”