कन्नड (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) नातेवाईक असलेल्या एका तरुणीला प्रेमाचे आमिष देऊन बोलावून, तिच्यावर शेतात दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कळंकी (ता. कन्नड) येथे घडली आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील संशयिताचे नाव मुकेश जाधव (वय २५, रा. कळंकी) असे असून, तक्रारदार तरुणी २३ वर्षांची आहे. ती नाशिक शहरात भाड्याने राहते. मुकेश आणि तिचे नातेवाईक संबंध होते. ओळख असल्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.मुकेशने लग्नाचे आमिष दाखवून तिला कळंकी येथे बोलावले. त्यानंतर १४ आणि २५ एप्रिल रोजी कळंकी शिवारातील एका शेतात तिच्यावर जबरदस्ती केली. नंतर जेव्हा तरुणीने लग्नाबाबत विचारले, तेव्हा त्याने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने कन्नड ग्रामीण पोलिसांकडे धाव घेतली.या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी (९ मे) गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या सोबत गोड गोड बोलून शेतात नेऊन ….
Published On: May 11, 2025 8:08 am
