दुर्दैवी! गवंढाळा गावावर काळाचा घाला! दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, तिसरा मृत्याशी झुंजतोय

दुर्दैवी! गवंढाळा गावावर काळाचा घाला! दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, तिसरा मृत्याशी झुंजतोय

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव तालुक्यातील गवंढाळा गावावर एकाच दिवसात दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी सायंकाळी लाखनवाडा ते आंबेटाकळी दरम्यान भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन विवाहित तरुण बांधकाम मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताने संपूर्ण गाव शोकमग्न झाला असून, दोन कुटुंबांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

BIG BREAKING: चिखली तालुक्यातील मेरा चौकी येथे भरदिवसा युवकाचा मर्डर? अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना…

शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. एमएच २८ एक्स ४४७४ या क्रमांकाच्या दुचाकीवरून तीन बांधकाम मजूर गवंढाळा गावाकडे परतत असताना, एमएच २८ बी ६३८७ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात जोरदार धडक दिली. या अपघातात राजू धोंडू सरदार (वय ३५) आणि विजय आनंद तायडे (वय ३४) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर किशोर गणेश तायडे (वय २४, रा. गवंढाळा) हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेले दोघेही विवाहित होते. राजू सरदार यांच्या मागे १२ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी आहे, तर विजय तायडे यांना सहा आणि चार वर्षांचे दोन चिमुकले अपत्य आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांतील बालकांचे वडिलांचे छत्र हरपले असून त्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे.

गावात एकाच दिवशी दोन तरुणांच्या चिता पेटल्याने गहिवरलेले वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईक, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोक आणि संतापाची भावना आहे. अपघातातील जखमी किशोर तायडेवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दोन तरुणांच्या अकाली मृत्यूने गावातील प्रत्येक घरात हळहळ व्यक्त होत आहे. जखमी किशोरच्या प्रकृतीबाबत गावकरी प्रार्थना करत असून, त्याच्या लवकर बरे होण्याची आशा व्यक्त करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!