बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):गौरींचे आगमन आज (३१ ऑगस्ट) होत असून, तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी घराघरांत उत्साहाचे वातावरण आहे. ज्येष्ठा व कनिष्ठ गौरींना पौष्टिक १६ भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा यंदाही जपली जाणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत विविध भाज्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.
स्थापनेचा मुहूर्त…
ज्येष्ठा गौरीच्या स्थापनेसाठी सकाळी १०.५३ ते १२.२७ हा अमृत मुहूर्त तर दुपारी २.०९ ते ३.३६ हा शुभ मुहूर्त असल्याचे पुरोहितांनी सांगितले. या मुहूर्तावरच घराघरांत गौरींची स्थापना केली जाणार आहे.
स्वागताची तयारी…
गौरींच्या आगमनासाठी घराघरांत सजावट करण्यात आली आहे. फुलांचे तोरण, आर्टिफिशियल फ्लॉवर डेकोरेशन, मोत्यांची सजावट यासाठी बाजारात शंभरहून अधिक हंगामी दुकाने लागली आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकांची संख्या जवळपास २० टक्क्यांनी वाढली असून, बाजारात तब्बल दीड कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नैवेद्याची परंपरा….
गौरींच्या पूजेत दररोज वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.पहिल्या दिवशी – मेथीची भाजी व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य.दुसऱ्या दिवशी – ज्येष्ठा महालक्ष्मी पूजनानंतर महानैवेद्य, ज्यामध्ये पुरणपोळी व पंचपक्वान्नांसह १६ भाज्यांचा समावेश असतो.
🌱 १६ भाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व
कारले – मधुमेहावर गुणकारी
आळू – बाळंतिणीला उपयोगी
मेथी – सांधेदुखी, मधुमेहावर उपयुक्त
भेंडी – व्हिटॅमिन C वाढवते
घोसाळी – रक्तशुद्धी
पडवळ – पचन सुधारते
टोमॅटो – व्हिटॅमिन C ने भरपूर
गवार – प्रथिनयुक्त, पचनासाठी चांगले
आंबटचुका – हृदयरोगावर गुणकारी
हरभरा – बलवर्धक, कफ कमी करणारा
बटाटा – दाह कमी करणारा
तांदुळका – कांजिण्यांच्या तापात गुणकारीपालक – लोहाने परिपूर्ण
राजगिरा – रक्तशुद्धी, मूत्रदाहावर उपयोगी
कोबी – जीवनसत्वांचा खजिना
शेपू – पोटदुखी व पचनाच्या त्रासावर लाभदायी
विसर्जनगौरींचे पूजन १ सप्टेंबर रोजी होईल, तर २ सप्टेंबर रोजी विसर्जन करण्यात येणार आहे.