BREAKING:मिशन परिवर्तन’चा परिणाम दिसू लागला! बुलढाणा पोलिसांचा मोठा यश..! दोन किलो गांजासह एक तस्कर रंगेहाथ पकडला …


बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज)
गांजा व्यापाराचे हब बनलेल्या बुलढाण्याला नशेमुक्त बनविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी हाती घेतलेल्या ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेचे परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागले आहेत. या मोहिमेअंतर्गत बुलढाणा शहर पोलिसांनी रविवारी रात्री मोठी कारवाई करत एक गांजा तस्कर रंगेहाथ पकडला आहे.


१४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे आठच्या सुमारास बुलढाणा–मलकापूर मार्गावरील बुद्धविहाराजवळील चहाच्या हॉटेलजवळ पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांनी संशयित व्यक्तीची झडती घेतली असता, त्याच्याकडून जवळपास दोन किलो गांजा, एक अँड्रॉईड मोबाईल, तसेच हिरो सुपर स्प्लेंडर मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या प्रकरणात बाबू पंडीत जाधव (वय ४३, रा. भडेच ले-आउट, बुलढाणा) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(२)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील आणि एलसीबी प्रमुख श्री. अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यात शहर ठाणेदार रवि राठोड, सपोनि जयसिंग राजपूत, पीएसआय रवि मोरे, तसेच पोलीस कर्मचारी संतोष वाघ, सुनिल जाधव, संदीप कायदे, संतोष साखळीकर, विशाल बनकर, मनाज सानुने, विनोद बारे, राम डोळे, नितीन चव्हाण यांच्या पथकाचा समावेश होता.


या कारवाईमुळे मिशन परिवर्तन अंतर्गत बुलढाण्यातील अंमली पदार्थ तस्करीवर पोलिसांनी आणखी एक प्रभावी धक्का दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!